आपला बीड जिल्हा
बीड जिल्हा परिषदेच्या क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न
सांघीक स्पर्धेत केजची निराशाजनक कामगीरी
वयक्तीक स्पर्धेत केजचे खेळाडू चमकले
वादळवार्ता वार्तांकन – केज
बीड जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी क्रिडा स्पर्धेत आष्टी व बीड तालूक्याच्या संघाने अनेक क्रिडा प्रकारात घवघवीत यश मिळविले तर केज संघाला सर्व सांघीक खेळात दारुन पराभवाला सामोरे जावे लागले, दोन दिवशीय क्रिडा आणि सांस्कृतीक स्पर्धेचे बक्षीस वितरण बीड जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्ख कार्यकारी अधिकारी श्री.अजित पवार अतिरिक्त मुख्खकार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके आदी मान्यवराच्या हस्ते रविवारी दि १३ रोजी जिल्हा क्रिडा संकूलात दिमाखदार सोहळ्यात आणि खेळाडूंच्या उत्फुर्त जल्लोशात संपन्न झाले.
या वेळी केज तालूक्यातील खेळाडूंनी वयक्तीक क्रिडा प्रकारात चांगल्या प्रकारे यश मिळविले, महिला गटात सोनाली राऊत थाळीफेक प्रथम,योजना सातव भालाफेक प्रथम, सोनाली राऊत लांबउडी प्रथम,गीता अंडील गोळाफेक द्वितीय तर पुरुष गटात आण्णा कदम भालाफेक प्रथम,श्रीकांत कांबळे बॅटमिंटन प्रथम या केज तालूक्यातील खेळाडूंनी जिद्दीने आणि उत्साहाने या स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले या यशाबध्दल गटशिक्षणाधिकारी श्री.सुनिल केंद्रे,दत्ता चाटे,संजय चवरे,अर्जून बोराडे,बाबासाहेब सारुक,किशोर भालेराव,शिवकुमार कोरसळे,विक्रम डोईफोडे,महादेव ढाकणे,विष्णु यादव,राहुल उंडाळे,तुषार पाटील,युवराज हिरवे आदी क्रिडाप्रेमींनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले
सांघीक क्रिडा प्रकारात सराव सातत्य कमी पडल्याने पराभवाला सामोरे जावे लागले परंतू यातून भरपूर शिकायला मिळाले-
किशोर भालेराव