केज नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापनाच्या भ्रष्टाचाराची तक्रार विभागीय आयुक्त यांचेकडे केली असता जिल्हाधिकारी यांनी दिले पत्राव्दारे आदेश
वादळवार्ता वार्तांकन – केज
केज नगरपंचायतच्या कचरा व्यवस्थापनात भष्टाचार झाला असल्या तसेच होत असलेबाबतची तक्रार मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड च्या वतीने करण्यात आली होती त्या अनुशंगाने दुसर्यांदा जिल्हाधीकारी बीड यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि केज नगरपंचायतच्या वतीने कचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे व सध्याचे सत्ताधारी करत आहेत त्यामध्ये कचरा गोळा करण्यापासुन ते कचरा विघटन करण्यापर्यंत तसेच स्वच्छतेच्या संदर्भात शासनाने दिलेल्या सुचना नियम न पाळता मनमानी कारभार करून शासकीय तिजोरी लुटण्याचे काम सातत्याने होत आहे .
या अनुशंगाने सदरील कचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार होत असलेबाबत तक्रार निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना यापुर्वी 5 जुलै 2021 रोजी दिले होते त्या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी यांनी 4 ऑगस्ट 2021 रोजी आजाक्र .2021 / आरबी – डेस्क – 1/ पोल – 1 / निवेदन / कावि – 34158 प्रमाणे चौकशीचे आदेश दिले होते परंतु कोणतीही चौकशी झाली नाही वा केली गेलेली नाही.

म्हणुन विभागीय आयुक्त यांना 8 सप्टेबर2021आजाक्र.1549 प्रमाणे तक्रार निवेदन मार्फत केज नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने देण्यात आले परंतु केज नगरपंचायत प्रशासनाने सदरील पत्र विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना न पाठवता दाबुन ठेवले. यामुळे सदरील कर्मचार्यावरती दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कारवाई होईल कि नाही ?
सदरील कचरा व्यवस्थापनाची चौकशी होत नसले कारणामुळे परत विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना संदर्भसहीत तक्रार निवेदन आजाक्र . ई 48782 एस.सी.4391 प्रमाणे 19 सप्टेबर 2022 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत दिले असता . परत दुस-यांदा जिल्हाधिकारी बीड यांनी चौकशीचे आदेश आजाक्र.2022/ आरबी – डेस्क -1/ पोल -1/ निवेदन/कावि/48782 प्रमाणे दिले आहेत .

केज नगरपंचायत कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात जिल्हाधिकारी बीड यांनी दोन वेळेस दिलेल्या चौकशीच्या आदेशावर चौकशी होईल का ? केज तहसिलचे तहसिलदार साहेब तथा केज नगरपंचायत मुख्याधिकारी साहेब याकडे लक्ष देतील का ? चौकशी होईल का ? याकडे सर्व केज शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!