क्राईम
सरकारी गायारणात अज्ञात व्यक्तीने केली गांजाची लागवड ; पोलिसांच्या छाप्यात ५६ लखाच गांजा जप्त
गौतम बचुटे । केज
केज तालुक्यातील बनसारोळा येथील सरकाती गायरान जमिनीत अज्ञात इसमांनी गांजाची लागवड केली होती. त्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफवडगाव पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून सुमारे ५६ लाख रु. ५५० किलो गांजा जप्त केला आहे.
या बाबतची माहिती अशी.की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनसारोळा येथील पारधी वस्ती लगत असलेल्या सरकारी गायरान जमिनीत तुरीच्या पिकात गांजाची झाडे असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना एका गुप्त खबऱ्या कडून मिळाली. माहिती मिळताच दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, सहाय्यक फौजदार अशोक थोरात, दिनकर तोंडे, योगेश समुद्रे, गणेश राऊत, महादेव केदार, जीवन जाधव, सुधीर बामदळे, भगवान खेडकर, प्रमीला गाडेकर यांनी छापा मारला. त्यावेळी त्या जमिनीत अज्ञात इसमाने तुरीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आल्याने पथकातील पोलीस कर्मचारी यांनी मेहनत करून ती गांजाची झाडे उपटून त्याचे घटनास्थळी वजन केले असता त्याचे वजन सुमारे ५५० कीलोग्रम होते. त्याची किंमत सरकारी भावाप्रमाणे ५५ ते ५६ लाख रु असली तरी ती कोट्यवधी रू चे आसपास आहे.
घटनास्थळी महसूल अधिकाऱ्यांची भेट
सदर प्रकार हा सरकारी गायरा न जमिनीत असल्याने तहसीलदार राकेश गिडडे यांच्या आदेशाने नायब तहसीलदार आशा वाघ-वाघमारे आणि तलाठी श्रीमती वाघमारे यांनी भेट दिली.
तलाठी व पोलीस अनभिज्ञ कसे ?
एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तेही सरकारी गायारान जमिनीवर अतिक्रमण करून त्यामध्ये गांजा सारख्या अंमली पदार्थांची लागवड होत असताना महसूल आणि पोलीस यंत्रणेला त्याची माहिती कशी काय मिळाली नाही याची चर्चा परिसरात होत आहे.