आपले केजक्राईम

वाहकास धक्का बुक्की करुण एसटीवर मारला दगड

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज तालुक्यातील कानडी माळी येथे एकाने एसटी बसवर दगड मारल्याने वाहक व एक नऊ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली.

या बाबतची माहिती अशी की, शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी धारूर आगाराची केज ते जिवाचीवाडी क्र. (एम एच -२०/ बी एल-०१३८) ही बस सायंकाळी ६:१५ वा. च्या सुमारास कानडीमाळी येथे गेली असता; बस थांब्यावर बस थांबली त्यावेळी याच बसमधून प्रवास करीत असलेला महादेव रावसाहेब खाडे या प्रवाशाने वाहक दत्तात्रय गवळी याच्या सोबत हुज्जत घालून भांडण केले. वाहक दत्तात्रय गवळी याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्या नंतर महादेव रावसाहेब खाडे याने एसटी बस मधून खाली उतरल्या नंतर एसटी बसवर दगड मारले. यात खिडकीच्या काचेतून दगड आत घुसल्याने वाहक दत्तात्रय गवळी आणि त्याच गाडीने प्रवास करीत असलेली किरण राठोड वय (१० वर्ष) या मुलीच्या मनगटावर दगडाचा किरकोळ मार लागला.

वाहक दत्तात्रय गवळी आणि चालक बाबुराव इंगोले यांनी एसटी बस केज पोलीस ठाण्यात आणलेली असून दगडफेक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!