वादळवार्ता – केज
तहसील कार्यालया अंतर्गत महसूल विभागात तलाठी पदावर काम करीत असलेल्या पाच तलाठ्यांना सेवा जेष्ठते नुसार पदोन्नती मिळाल्याने ते मंडळ अधिकारी झाले यामध्ये केज सज्जाचे तलाठी लहू भिमराव केदार हे मोहखेड ता.धारुर येथे मंडळ अधिकारी
म्हणून नियुक्त झाल्याने त्यांचे मित्र मंडळी आणि अधिकारी वर्गाकडून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ / मुंडे मॅडम यांनी पदभार घेताच जिल्ह्यातील विविध कामाकडे स्वतःच लक्ष देऊन यापूर्वी रखडलेल्या कामाला आगोदर प्राधान्य देऊन ते निकाली काढले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.बीड जिल्ह्यात असलेल्या आकरा तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या महसूल विभागातील रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ / मुंडे मॅडम यांनी २७ फेब्रुवारी रोजी निकाली काढून २९ तलाठ्यांना मंडळ अधिकारी पदावर नियुक्त करुन त्यांना आप-आपल्या नियुक्त जागेवर रुजू होण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. केज तहसील कार्यालयात महसूल विभागा अंतर्गत तलाठी एम.एच.जायभाये यांची च-हाटा जि.बीड येथे मंडळ अधिकारी,
डी.एम.मस्के चिंचोली माळी ता.केज येथे मंडळ अधिकारी ,व्ही.ए.देशमुख मस्साजोग येथे मंडळ अधिकारी, एल.टी.भोरजे अंजनडोह ता.धारुरयेथे मंडळ अधिकारी,केजचे तलाठी लहू भिमराव केदार यांची मोहखेड ता.धारुर जि.बीड येथे मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली असल्याने त्यांचे मित्र मंडळी आणि अधिकारी वर्गाकडून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!