आपला बीड जिल्हाआपले केज

लातूर येथुन चोरीस गेलेली CRUISER जिप केज पोलीसांनी केली पोलीस स्टेशन लातुर येथील कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन

वादळवार्ता – केज

एक CRUISER कंपनीची सिलव्हर रंगाची चार जिप क्र MH.24.V.7628 ही चिंचोल माळी फाटा येथे बेवारस पणे उभी असल्याची गोपणीय माहिती पोना/1837 गित्ते यांना मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी पोनि / बाळासाहेब पवार यांना देवुन त्यांचे मागर्दशनाखाली पोउपनि / राजेश पाटील, पोना / 1837 गित्ते, पोना / 1877 सोपने, पोकॉ/471 संतोष गित्ते, पोकॉ/2172 बहिरवाळ, पोकॉ/1057 शमीम शेख अशांनी रवाना होवुन गुप्त बातमीदारांव्दारे मिळालेल्या माहितीची पथकाने खात्री केली असता सदर ठिकाणी जिप क्र MH. 24. V.7628 ही मिळुन आली होती. सदरची जिप ही पो स्टे ला घेवुन आल्यांनतर सदर जिपची चौकशी केली असता सदर जिप ही जिप ही MIDC पोलीस स्टेशन लातुर, जिल्हा लातुर येथील गुरनं 116/2023 कलम 379 भादवि या गुन्हयात चोरी गेल्याची असल्याचे समजले. त्या प्रमाणे MIDC पोलीस स्टेशन लातुर यांना संपर्क करुन CRUISER कंपनीची सिलव्हर रंगाची चार जिप क्र MH.24.V.7628 ही MIDC पोलीस स्टेशन लातुर येथील कर्मचारी यांचे ताब्यात देण्यात आली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!