आपला बीड जिल्हा
पोलिसांनी मद्याचा मुद्देमाल केला नष्ट

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या छाप्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेल देशी, विदेश आणि हातभट्टी दारू हा मद्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केज पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसा पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अवैद्य मद्य विक्री व चोरटी वाहतूक यावर कारवाया करून देशी दारू, विदेश मद्य आणि हातभट्टी यासह मद्याचा साठा जप्त करून कार्यवाही केलेली होती.




