आपला बीड जिल्हाक्राईम

केज तालुक्यात नराधमाने केला अल्पवयीन चुलत बहिणीचा विनयभंग !

जाब विचारणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांचा मारहाणीत हात फ्रॅक्चर

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यात एका नराधमाने नात्याने त्याची चुलत बहीण असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून त्याचा जाब विचारायला गेलेल्या पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली आहे.

केज तालुक्यातील एका गावातील  १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा नात्याने तिचा चुलत भाऊ असलेल्या नराधमाने विनयभंग करून नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गेली अनेक दिवसांपासून हा नराधम ती शाळेत जात असताना मोटार सायकलवरून तिचा पाठलाग करीत होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा आग्रह करीत होता. तसेच तिने ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पीडित अल्पवयीन मुलीने ही माहिती तिच्या आई वडिलांना सांगितल्या नंतर पीडीतेच्या वडिलांनी त्या नारधमास जाब विचारला असता तो नराधम, त्याचा भाऊ आणि वडील यांनी संगनमत करून पीडितेचे वडील यांना मारहाण केली.नराधमाने कमरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच त्याच्या भावाने हातावर लोखंडी खीळ मारून डावा हात फ्रॅक्चर केला आणि त्याच्या वडिलांनी पण मारहाण केली.

या मारहाणीत त्याचा हात फ्रॅक्चर झाला. नंतर पिडीतेच्या वडिलांवर नांदूरघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढे बीड येथे उपचार करण्यात आले.

दि. १८ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून नराधम चुलत भावासह तिघांवर गु. र. न. ४७३/२०२२ भा. दं. वि. ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो २०१२ चे कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तापास केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सिमाली कोळी या करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!