आपला बीड जिल्हा
दिपावली निमित्त मस्साजोग ग्रामस्थांना आनंदाचा शिधा वाटप.
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने गर्दी
वादळवार्ता वार्तांकन – अनंत जाधव
केज तालुक्यातील मस्साजोग येथे दिपावली निमित्त गोरगरीब जनतेची दिपावली आनंदात साजरी होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गावा गावातील वाड्या वस्त्या वरील गोरं गरिब जनतेची दिपावली गोड व आनंदात साजरी होण्यासाठी सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला व सर्व राशन दुकानदारांना दिले आहे.तरी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संकल्पनेचे व आदेशाचे तंतोतंत पालन करत मस्साजोग येथील राशन दुकानदार जी,डी, देशमुख यांनी दिनांक २७ ऑक्टोबर सोमवार रोजी मस्साजोग येथील सर्व शिधा धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. त्यात गहू, तांदूळ,गोडेतेल, साखर ,रवा, चणाडाळ इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.आनंदाचा शिधा घेण्यासाठी गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राशन दुकानदार, महिला, ज्येष्ठ नागरिक, नागरिकांनी आनंदाचा शिधा वाटप केल्याबद्दल केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, महसूल प्रशासनाचे आभार मानले आहेत.
अगोदरच बीड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला घास हिरावून नेल्यामुळे शेतकरी चिंतेत होता पण दिवाळीचे फराळ करणे हे शेतकर्यांसाठी व गोरगरीब जनतेसाठी शक्य नव्हते पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करून आम्हा गोरगरीब जनतेची व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी मदत केल्याबद्दल मोदी सरकारचे व शिंदे सरकारचे मनःपुर्वक आभार.
अण्णासाहेब शिंदे
शिधा लाभधारक मस्साजोग