आपला बीड जिल्हाआपले केज
रमेशराव आडसकर यांनी माझ्यावर वेळोवेळी विश्वास दाखवला – सभापती अंकुशराव इंगळे

वादळवार्ता – केज
केजच्या आमदार मुंदडा भाजपाचे जेष्ट नेते रमेशराव आडसकर यांच्या तथा अन्य नेते गनांच्या उपस्थितीत नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळीचा निकाल लागल्यानंतर शेतकरी विकास पॅनलचे एकुण चौदा उमेदवार विजयी झाले त्यामध्ये तीन उमेदवारांना बिनविरोध काढण्यात पॅनलप्रमुख यशस्वी झाले होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती निर्विवादपणे भाजपाच्या ताब्यात गेल्यानंतर आज दि १२ मे रोजी केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ,उपसभापती पदांच्या निवडी झाल्या त्यामध्ये केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अंकुश इंगळे तर उपसभापतीपदी डॉ. वसुदेव नेहरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन राधाकिसन मोटे यांनी कामकाज पाहिले . त्यानंतर भाजपाच्या मुख्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वागत व पदग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित सभापती अंकुशराव इंगळे यांनी बोलताना ” मी १७ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार बघत आहे . या दरम्यान कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. माझ्याकडून कोणालाही त्रास व कोणावरही अन्याय होणार नाही याची मी वेळोवेळी दक्षता घेतली आहे तसेच सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहे व करत राहील तसेच रमेशराव आडसकर यांनी माझ्यावर वेळोवेळी विश्वास दाखवला . मधल्या काळामध्ये कांही प्रमाणात ताकझाक झाली असेल परंतु आज मी सांगतो कि रमेशराव आडसकर सारखा दुसरा नेता नाही याप्रकारे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा दरम्यान पदाधिकारी तथा नेत्यांनी आप आपली मनोगते व्यक्त केली व नवनिर्वाचीत पदाधिकारी यांना सुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साखरे सर यांनी केले तर आभार सुरेद्र तपसे यांनी मानले.
कार्यक्रम सुरु झाल्यानंतर १५ मिनिटे पत्रकारांना बसण्यासाठीची व्यवस्था न केल्यामुळे पत्रकारांना ताटकळत उभे राहुन वृत्तांकन करावे लागले.



