शेख नसिर / लहुरी प्रतिनिधी
केज तालुक्यातील लहुरी गावात हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
दि. 20/11/2024 लहुरी गावातील तरुणांनी एकत्र येऊन हजरत सुलतान जयंती साजरी करण्यात आली बुधवार २० नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील जयंती समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनागेत व्यक्त करताना सांगितले की, टिपू सुल्तान यांचा जन्म २० नोव्हेंबर १७५१ रोजी कर्नाटकातील देवनहल्ली येथे झाला होता. ते म्हैसूर राज्याचे शासक होते, त्यांच्या धाडस आणि युध्द-कौशल्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांना टायगर ऑफ म्हैसूर म्हणून ओळखले जाते१९८२ साली हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतानाने म्हैसूरचे कारभार सांभाळला. त्यांना प्रशासनात सुधारणा केल्या आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक उपाय योजना केल्या ते आधुनिक तोफा आणि लष्करी तंत्रज्ञान वापरणारे पहिले भारतीय शासक होते. टिपू सुलतान यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध चारवेळा युध्दे लढली. पहिले युध्द आणि दुसरे युध्द इंग्रजांविरुद्ध धाडसी लढाया देउन इंग्रजांना आव्हान दिले होते. यावेेळी
मोठया संख्येन तरुण तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.