केज येथे मोठ्या उत्साह पूर्ण आणि जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भव्यदिव्य अशा शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ आणि सिंहसनाधिष्टीत मूर्ती आणि प्रचंड जल्लोषपूर्ण वातावरण व तरुणांचा सहभाग होता.
केज येथे गुंड गल्ली, धारूर चौक, क्रांती नगर आणि समर्थ नगर मधून चार प्रमुख शिवजयंती मंडळांच्या वतीने शिव जयंती साजरी करण्यात आली. मिरवणुकीत प्रचंड उत्साहात आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ व सिंहासनाधिष्टीत मुर्त्या आणि डी जे व विद्युत रोषणाईत मिरवणुका काढण्यात आल्या. डी जे च्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकली. तसेच मिरवणुकीत हलगी, ढोल, ताशा, संबळ, आदी पारंपारीक वाद्ये आणि मावळ्यांची वेधभूषा केलेले शिवप्रेमी देखील होते. या वेळी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक कादरी या अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!