आपला बीड जिल्हा

बीड जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा – राष्ट्रवादी कॉंग्रेस 

उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन 

वादळवार्ता वार्तांकन – अंबाजोगाई

बीड जिल्ह्यासह केज विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.कापूस, सोयाबीन व अन्य पिके डोळ्यासमोर वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी पुर परिस्थितीमुळे पिकांसह शेतजमीनी खरडून वाहून गेल्या आहेत. बळीराजा संकटात सापडला आहे .

म्हणुन बीड जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट २५% अग्रीम पिक विमा व अनुदान जाहीर करावा.या मागणी साठी आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी मा. आमदार पृथ्वीराज साठे ,मा. आमदार संजय दौंड राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यासह शेतकरी बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!