जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या बिअर बारवर पंकज कुमावतांची धाड !
१ लाख ४१ हजार रु चा मुद्देमाल जप्त
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज :- गणेश चतुर्थी निमित्त सर्व देशी दारू दुकाने आणि बिअर बार परमिट रूम यांच्या अनुज्ञपत्या बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या केज येथील एका बिअर बार मध्ये मागील दाराने विक्री करीत असलेल्या बिअर बारवर पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बुधवार दि.३१ ऑगस्ट रोजी माहिती समजली की, केज येथील केज-बीड महामार्गावरील शिक्षक कॉलनी जवळ असलेले प्रशांत बिअरबार हे गणेश चतुर्थी निमित्त दारू व मद्य विक्री बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून आणि समोरील दरवाजा बंद करून मागच्या दाराने दारू विक्री करीत आहे. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, सचिन अहंकारे, संजय टूले आणि रामहरी भंडारे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच या पथकाने सायंकाळी ७:३० वा. प्रशांत बिअरबारवर छापा टाकला असता पाठीमागील दरवाजा उघडा ठेवुन त्यातून ग्राहकांना दारू देत असल्याचे आढळून आले. बिअर बारमध्ये दोन इसम हे आतील चार इस्माना दारू विक्री करीत असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले.
पोलिस पथकाने दारू विक्री करणारांची चौकशी केली असता त्यांची नावे ही अशोक साहेबराव खाडे रा. सुकळी ता. केज आणि सागर रंगनाथ सावंत रा. सावंतवाडी ता. केज हे असल्याचे निष्पन्न झाले. पंचा समक्ष बिअरबार मधील १ लाख ४१ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला .
पथकातील पोलीस अंमलदार बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादी वरून प्रशांत बिअरबारचे मालक कैलास विलास रांजणकर आणि त्यांचे नौकर अशोक साहेबराव खाडे, सागर रंगनाथ सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच याच पथकाने शहरातील दोन ठिकाणी छापे मारून ६ हजार ९०० रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
सदरची कारवाई माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, बाबासाहेब बांगर ,बालाजी दराडे, सचिन आहकारे ,संजय टूले रामहरी भंडारे यांनी केली .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!