त्या दोघींना न्यायालयीन कोठडी
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज येथील बसस्थानकातून देवदर्शनालाजाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ६५ हजाराचे दागिने चोरणाऱ्या चोरांचा तपास लावण्यात यश मिळविले असून अवघ्या २४ तासाच्या आत दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तपासात सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासात मदत झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, गुरुवार दि. २९ सप्टेंबर रोजी केज शहरातील क्रांती नगर भागात राहत असलेल्या सुरेखा श्रीराम दांगट आणि त्यांचे नातेवाईक सुनिता मधुकर मोरे, द्वारका बाबुराव मोरे या सकाळी ११:०० वा. च्या सुमारास धारूर तालुक्यातील अंबाचौंडी देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. अंबा चौंडी देवीला जाण्यासाठी त्या केज शहरातील बसस्थानकातून धारूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना; गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुरेखा दांगट यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण तोडून घेत पोबारा केला होता.
या बाबत दि. ३० सप्टेंबर रोजी सुरेखा दांगट यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गु. र. नं. ४४२/२०२२ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला होता.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार श्रीकांत चौधरी हे करीत होते. बस स्टॅंडच्या सीसीटीव्ही
फुटेज आधारे पोलिसांनी तपास केला असता तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिलांची हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. चोरी केल्या नंतर त्या दोघी येरमाळ्याला गेल्या आणि त्या नंतर दि. ३० सप्टेंबर रोजी परत बीडकडे जाण्यासाठी केज येथे आल्या ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी सापळा लावला आणि मंगल सतीश तुसांबर, रा. पेठ बीड आणि केशरबाई सुखदेव जाधव रा. नाळवंडी नाका, बीड त्या दोघी बस स्टॅंड जवळील हॉटेल बसंत बिहार समोर दोघींना ताब्यात घेतले. त्या नंतर रात्री त्यांना न्यायालयाच्या परवानगीने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या नंतर त्यांच्या कडून त्यानी चोरलेले गंठन हस्तगत केले. दि. १ ऑक्टोबर रोजी केज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्या दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!