केज । प्रतिनिधी
भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केज तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या आदेशाने तथा मराठवाडा कार्याध्यक्ष दशरथ रोडे याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या केज तालुक्याच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या नव्याने गठीत झालेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी अजय भांगे यांची फेरनिवड करण्यात आली असुन उपाध्यक्षपदी प्रखर लेखनीचे सुदेश दादा शिरसट यांची नियुक्ती तर संघटक म्हणून अजमोदीन इनामदार यांची आणि दै.जननेताचे संपादक सनी शेख यांची तालुका सचिवपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे केज तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य केले जाईल, असा विश्वास दै. वादळ वार्ताचे संपादक तथा नवनिर्वाचीत केज तालुकाध्यक्ष अजय भांगे यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!