आपला बीड जिल्हासामाजीक

मुप्टा संघटनेचा क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे २५ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण – प्रा.प्रदिप रोडे

वादळवार्ता वार्तांकन – बीड

महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन (मुप्टा) च्या वतीने देण्यात येणारा क्रांतीबा ज्योतिबा फुले – २०२२ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण २५ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी दिली आहे.

महात्मा फुले स्मृती दिनाचे औचित्य साधुन मुप्टा संघटनेच्या वतीने सलग १४ वर्षी शैक्षणिक,साहित्य,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या वर्षीचे पुरस्कारार्थी प्राचार्य डॉ.राहुल निवृत्ती सुर्वे (श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील कॉलेज ऑफ होम सायन्स अकलूज,जिल्हा सोलापूर), प्राचार्य डॉ. एम.जे.शेख (रुक्मिणीबाई आर्ट्स अँड कॉमर्स महिला कॉलेज,अमळनेर जिल्हा जळगाव), श्रीमती सुनिता विष्णू गायकवाड (माध्यमिक शाळा पोत्रा ता.जिल्हा बीड), श्रीमती सुनिता तुळशीराम शिंदे ( शिवसृष्टी बी.एम.सी मराठी शाळा कुर्ला,मुंबई), आयु राजेंद्र शाहूराव लाड ( जि.प कन्या प्रशाला ता.आष्टी जि.बीड), श्रीमती शारदा भागवत घोळवे( जि.प प्रशाळा वाकडी ता.कळंब, जि.उस्मानाबाद), प्रा. बिभीषण सौदागर चाटे ( घाटशिळा कनिष्ठ महाविद्यालय, घाटशिळ पारगाव ता.शिरूर (का) जि.बीड) , श्रीमती शामल शिवलिंग रेनगडे ( जि.प. प्र.शाळा केसापुरी ता.माजलगाव जि.बीड), श्रीमती सुवर्णा अशोक गायकवाड (केंद्रीय कन्या शाळा, सोनपेठ,जि.परभणी), आयु. सुभाष आसाराम बास्कळ (जि.प.प्रशाळा, मानकापूर,ता.गेवराई,जि.बीड), प्रा. डॉ. हमराज उदयभान उईके (पीव्हीपी महाविद्यालय,ता.पाटोदा जि.बीड), आयु.माधव प्रभाकरराव लोखंडे (मांडव्यऋषी विद्यालय मांडाखळी जि.परभणी), प्रा.दिपक दगडु जमधाडे (सौ.के.एस.के महाविद्यालय,बीड), मा. मोहम्मद वाजेद शेख ( मिल्लिया हायस्कूल, ता.धारूर जि.बीड), प्राचार्य.डॉ.पांडुरंग रामराव सुतार (जीवनदीप महाविद्यालय पिंपळनेर,ता.जि. बीड) हे आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षण प्रेमी आणि समाजातील सर्व घटकांनी व पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, कार्याध्यक्ष प्रा.राम गायकवाड, निवड समिती सदस्य प्रा.विनोद किर्दक,प्रा.डॉ.नामदेव शिनगारे,शरद मगर, श्रीकांत वारभुवन,प्रवीण तरकसे, संजय बागुल,जिल्हा सचिव प्रा.राम गव्हाणे,शरद मगर,श्रीकांत वारभुवन ,डॉ.संजय कांबळे ,प्रवीण तरकसे यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!