गौतम बचुटे / वादळवार्ता
दि. १९ ऑगस्ट शनिवार सायंकाळी ७:०० वा. च्या दरम्यान केज कळंब रोडवर युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांगवडगाव फाट्या जवळील पेट्रोल पंपा जवळ क्र. (एम एच ४४/व्ही ०४७८) व आणि अन्य दुसरी मोटार सायकल या दोन्ही एकमेकांना धडकून त्या रस्त्याने जात असलेल्या एका टँकर क्र. (एम एच-४४/१५००) धडकल्या. झालेल्या अपघातात राहुल मुसळे (रा. धारूर) व संतोष काळे (रा. निलंगा) हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच केज येथील १०८ रुग्णवाहिकेचे पायलट उमेश हंगे आणि सोबत डॉ. ऋतुजा मोटे या तात्काळ अपघातस्थळी हजर झाले.
दरम्यान रुग्णवाहिका पोहोचण्या पूर्वी त्यांना खाजगी वाहनांतून कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्या उपचार चालु आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!