आपला बीड जिल्हाआपले केजभ्रष्टाचार

बीडचे सि.ओ.अजित पवारांनी ग्रामसेवक धनंजय खामकर यांना केले निलंबित

वादळवार्ता वार्तांकन 

तालुक्यातील लहुरी येथील पंडित वसंतराव चालक यांच्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन नियुक्त केलेल्या पथकाने चौकशी केली असता ते दोषी आढळून आल्याने पंचायत समितीमधील ग्रामसेवक धनंजय आबाराव खामकर यांना बीडचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी २८ डिसेंबर रोजी लेखी आदेश काढून सेवेतून निलंबित केल्याने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गटविकास अधिकारी पंचायत समिती, केज यांनी मौजे लहुरी येथील पंडित वसंतराव चाळक यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी अहवालानुसार आपण वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, ग्रामपंचायतच्या व स्वतःच्या नावावर रक्कम रु.२,४०,०००/- उचलुन लेखासंहिता २०११ मधील तरतुदीचे उल्लंघन करुन अनियमितता केल्याचे दिसुन आले आहे, जीएसटी.१२% रु.७३.३१८/- १ % कामगार विमा रु. ६,११०/- व रॉयल्टी रु.८,२१६/- असे एकूण रक्कम रु.८७,६४४/- एवढी रक्कम वसुल करुन शासन खाती भरणा केली नसल्याचे निदर्शनात आले आहे. कामातील निधीपेक्षा रक्कम रु.१,५००/- जास्तीचा खर्च दर्शवून अनियमितता केलेली आहे. व्यायामशाळा बांधकामाच्या अंदाजपत्रकात नोंदविलेल्या मोजमाप पुस्तिकेत व प्रत्यक्ष केलेल्या चटई क्षेत्रात तफावत असल्याचे दिसून आले. सदर काम पुर्ण नसतांना सुध्दा दिनांक २६/११/२०२९ रोजी मोजमाप पुस्तिकेत काम पुर्ण झाले असल्याची नोंद करुन कामाचे मुल्यांकन श्री.सय्यद, कनिष्ठ अभियंता यांनी केले. असल्याचे तसेच काम पुर्ण झाल्याची शहनिशा न करता सदर मोजमाप पुस्तिकेत व मुल्यांकन प्रमाणपत्रावर श्री. पवार उप अभियंता यांनी स्वाक्षरी केली असल्याचे दिसुन येते. दिनांक ०९/५/२०२२ व दि.२०/०६/२०२२ रोजी सदर कामाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर अपूर्ण राहीलेले काम चुकीचे झाल्यामुळे नंतर पुर्ण करुन घेणे, तसेच कनिष्ठ अभियंता व उप अभियंता हे केज तालुक्यात कार्यरत नसतांना सुध्दा मोजमाप पुस्तिका व मुल्यांकन प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केल्याचे दिसुन आल्याने बीडचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी २८ डिसेंबर रोजी लेखी आदेश काढून धनंजय आबाराव खामकर ग्रामसेवक यांना जि.प.सेवेतून निलंबित केल्याने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!