विशेष

जंगली रम्मी गेमच्या जाहिराती वरुन अभिनेता अजय देवगण याला RTI कार्यकर्त्याने पाठवले पत्र

वादळवार्ता – नांदेड

अँड्रॉइड मोबाईल वरती विविध गेम प्ले स्टोअर वरूण डाउनलोड करुन मनोरंजनासाठी खेळले जातात .परंतु हल्ली अँड्रॉइड मोबाईल वरती पैशाचे विविध प्रलोभने दाखवुन युवा तरुण पिढीला आकर्षित करुन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असताना दिसते आहे. आणी विशेष म्हणजे या रम्मी गेमच्या जाहिराती अभिनेता /अभिनेत्री मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामध्ये अभिनेता अजय देवगण याने जंगली रम्मीची जाहिरात केल्यामुळे नांदेड येथील RTI कार्यकर्ता विलास प्रतापराव शिंदे रा. वसुर ता. मुखेड यांनी चक्क जंगली रम्मीची जाहिरात करणाऱ्या अभिनेता अजय देवगण याला पत्र लिहिले असुन त्याने पत्रात असे म्हटले आहे कि ,

महोदय ,

अभिनेता अजय देवगन स. नमस्कार व राम राम आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खुप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्यांने सोशल मीडियावर केले पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जनु सवयच लागली. ? व याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत? त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. व जाहीरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितले पाहिजे. व नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे सर्व आपण सांगितले पाहिजे. जर याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे, आणी हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशे जाहीराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहीरात बंद करावी व नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे ही विनंती.

यावर अभिनेता अजय देवगन या RTI कार्यकर्त्याने वास्तववादी लिहिलेल्या पत्राला उत्तर देईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!