वादळवार्ता – केज
केज शहर तथा तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी चौदा वर्षा खालील मुला- मुलींन करीता स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या माध्यमातुन क्रिडा क्षेत्रात भरारी घेण्यार्यानंकरिता प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जाते .
या बाबत सविस्तर वृत्त असे कि विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने केज शहर तथा तालुक्यातील ग्रामीण भागातील चौदा वर्षा खालील मुला- मुलींन करीता फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल , बुद्धीबळ , योगा, तायक्वांदो आदि खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन आज भाजपाचे जेष्ट नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या तसेच केज नगरपंचायत नगराध्यक्ष सिता बनसोड , अंकुशराव इंगळे श्री. इनामदार , दिलीपराव गुळभिले, डॉ.वासुदेव नेहरकर , जी.बी. गदळे सर , पत्रकार रामदास तपसे , पत्रकार मुबाशीर खतीब , पत्रकार अजय भांगे, हांडिबाग सर गुणवंत क्रिडा शिक्षक पुरस्कार्थी बंन्सी राउत सर , क्रिडा शिक्षक तोंडसे सर , काकनाळे सर आदिच्या उपस्थितीतीमध्ये संपन्न झाले. प्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार केज तालुका क्रिडा संयोजन विनोद गुंड सर यांनी केले तर सुत्रसंचालन गिरी सर यांनी केले तसेच आभार नेहरकर जी.एम. यांनी मानले. सदरील कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!