वादळवार्ता नेकनुर – शाकेर शेख
चुंबडी फाटा ते धायगुडा पिंपळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे रखडले आहे. मराठवाडय़ातील मोठा जनावरांचा बाजार अनेक महिन्यांपासून शासनाने बंद केले आहे. येथे विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. केशरी रेशन कार्ड व शेतकऱ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रश्र घेऊन नेकनुरच्या जनतेच्या प्रचंड उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे ग्रा. पं.चे गटनेते सय्यद साजेद अली उर्फ बाबुभाई, जेष्ठ नेते चंद्रकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन संपन्न झाला आहे.
या वेळी नारायण शिंदे यांनी नेकनूरच्या जनतेच्या मनातील उग्र भावना व्यक्त केल्या एच.पी.एम कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे गेल्या पाच वर्षांपासून हा रडगाणं सुरू असून संपूर्ण नेकनुर शहराची नाक असलेल्या मेन रोडला बेचिराख करून टाकले आहे.
रस्ता अर्धवट असल्याने अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. भांडारवाडी पाणी पुरवठय़ाची पाईपलाईन तोडुन नागरिकांवर वाईट वेळ आणली आहे. तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेला नेकनुरचा जनावरांचा बाजार अजून किती दिवस बंद ठेवता शासनाला माणसं जगु देयची की नाही बाजार बंद असल्याने अनेकांवर वाईट वेळ आली आहे. आता आमचा सहनशीलतेचा अंत झाला आहे.
विज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे व विज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. नेकनुरचा विज पुरवठा येळंबघाट उपकेंद्रा ऐवजी नेकनुरच्या ३३ के.व्ही उपकेंद्राला जोडणे अत्यंत आवश्यक आहे. ते तात्काळ जोडण्यात आले पाहिजे. शिंदे – फडणवीस सरकारने शेतकरीचे व केशरी रेशन कार्ड धारकांचा धान्य पुरवठा बंद करून गोरगरीबांना उपासमारीची वेळ आणली आहे. त्यांना पुर्वी प्रमाणे धान्य पुरवठा तात्काळ सुरू करा नेकनुरच्या जनतेने प्रचंड प्रचंड संख्येने उपस्थित राहुन आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो असे ते म्हणाले यावेळी सय्यद साजेद अली उर्फ बाबुभाई, तुळजीराम शिंदे सर यांनी अक्रमक भुमिका मांडली या वेळी प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी व यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशावरून दोन दिवसात सर्व प्रश्रां वर अधिकारी व आपली बैठक घेऊन सर्व प्रश्र मार्गी प्रयत्न करु असे आश्वासन दिले या आंदोलनात सय्यद खालेद पत्रकार, तुळजीराम शिंदे सर, ईजहारोदीन जहागीरदार, दिगंबर लांडगे,महादेव मुळे, शिवाजी शिंदे, सचिन शिंदे, लालू जागीरदार, शेख फाजेल बागा, विजय निर्मळ, हामेद सलीम, सलीम पाशा सौदागर,आजम पाशा,अ. जब्बार कुरेशी, गणेश शिंदे, छत्रभुज डिसले, अनिल निर्मळ, गजेंद्र शिंदे, सौदागर सावंत, जफर पाशा जागीरदार, मिर्ज़ा रफिक बेग, विनोद काजळे, सखाराम शिंदे, सखाराम शिंदे, विवेक शिंदे, शेख अजीम पैलवान, मिर्ज़ा फरहत बेग, शेख ईखलास, शेख युनूस शाह, लादेन पाशा, यांच्या सह शेतकरी व्यापारी व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. यावेळी स. पो. नि. विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.