वादळवार्ता – केज
केज दि. ९ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीसोबत सोमवारी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या गुन्ह्यातील आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
शासनाने बाललैंगिक अत्याचार संदर्भात कितीही कायदे कठोर केले असताना देखील या बाललैंगिक अत्याचार काही कमी होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.केज तालुक्यातील एका गावातील एका सहा वर्षीय बालिका ही गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत असुन ती सोमवार दि.७ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी घरी आल्यानंतर ती घराशेजारील लहान मुला सोबत खेळण्यासाठी गेली असता मुलाच्या आजोबाने या मुलीला जवळ बोलावून घेतले आणि तिच्या नको त्या ठीकाणी हात घालून लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलगी तिच्या घरी रडत गेली आणि तिच्या सोबत झालेली घटना तिच्या आजीला सांगितली.संध्याकाळी मुलीची आई शेतातून कामावरून घरी आल्यावर तिला दुपारी घडलेला प्रकार सांगताच मुलीचे आई वडील भयभित होऊन त्यांनी सोमवारी संध्याकाळी केज पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सदरील घटना सांगून आरोपी विरुध्द बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच जमादार बाबासाहेब बांगर,शिवाजी कागदे यांनी आरोपी ताब्यात घेतला आहे.या घटनेचा पुढील तपास फौजदार आनंद शिंदे हे करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!