संपादकीय

बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेशवरी नव निधी अष्ट सिद्धी प्राप्त शांती ब्रह्म राष्ट्र संत भगवान बाबा

बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेशवरी नव निधी अष्ट सिद्धी प्राप्त शांती ब्रह्म राष्ट्र संत भगवान बाबा


वादळवार्ता विशेष वार्तांकन – गणेश ढाकणे

राष्ट्रसंत भगवानबाबा आणि अध्यात्म व भक्तगण असे हे फिट्ट जमलेले समीकरण म्हणजे एकाला वजा केले तर दुसरा अपुर्ण. कारण की ईश्वर दयाळू आहे हे अक्षम्य चुका करणार्‍या माणसाला नाकारता येणारं नाही परंतु ईश्वर एक स्पेशल डिझायनर आणि एडिटर देखील आहे जो प्रत्येकाला या भूतालावर त्याच्या आयुष्याचे ध्येय कानात सांगून पाठवतो असे कधी कधी वाटू लागते कारण संत महंत हे जन्माला येतात आणि त्यांच्या क्षेत्रात अतुल्य कार्य करतात असेच राष्ट्रसंत भगवानबाबा जे भक्ती-शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम म्हणता येईल कारण इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला गेले तर राज्यातील महत्वांच्या संतांना खूप खडतर कठीण प्रवास करावा लागला त्यापैकी एक राष्ट्रसंत भगवानबाबा ज्यांची आज जयंती.

आयुष्याच्या प्रवासात अखंड जीवन खडतर संघर्ष आला तरी आपल्या बुद्धीकल्पकतेने संघर्षावर मात केलेले महाबली वीर हनुमान आणि विश्वरत्न संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखं खडतर ब्रह्मचार्य व्रत स्वीकारुन लोककल्याणासाठी जीवन समर्पित करण्याचा वारकरी सांप्रदायाचे दैवत प्रभु विठ्ठलासमक्ष संकल्प करुन गुरुमंत्र मिळविण्यासाठी दिव्य अशी परीक्षा दिली. अवस्थेत 70 फुट उंचीच्या शिखरावरुन बाल आबाजी यांनी उडी मारल्यावर साक्षात गुरुंना गरुडावर बसून भगवान विष्णु यावेत अशा अनुभवाची चुणूक झाल्याने बाल आबाजीचे गुरु संत माणिकबाबा यांनी भगवान असे नामकरण केले पुढील काही दिवसातच नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली परंतु जन कल्याण करण्यासाठी आणि ईश्वराचा बोध सर्व सामान्य लोकांना झाला पाहिजे यासाठी कठीण तपस्या योगेश्वरी देवीचे पीठ असणारे अंबाई नगरी म्हणजे आजचे अंबाजोगाई येथून जवळच असणार्‍या मुकूंदराज यांच्या समाधी मंदिराच्या गुहेत निर्जळ अडीच वर्षे निरंकार उपवास करत परमेश्वराची तपसाधना केली. सोबतीला अनेक साप, वाघ, हिंस्त्र पशु आजु-बाजुला बसलेले असायचे याचे अनेक लोक साक्षीदार आहेत. सर्प तर अक्षरशः अंगावर खेळायचे या कठीण परिस्थितीत तपस्या पुर्ण करुन ज्ञानेश्वरी पारायण करुन नवनिधी अष्टसिद्धी प्राप्त केल्या तेथून परत आल्यानंतर संतश्रेष्ठ उच्चकोटीचे गुरु बंकट स्वामी महाराज यांची भेट झाल्यानंतर बंकटस्वामी महाराजांनी आपल्या सोबत आळंदी येथे अध्यात्मिक शिक्षण पुर्ण करुन परत आल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून लोकांच्या मनात अध्यात्मिक गोडी निर्माण करण्यासाठी नारळी सप्ताह उत्सवाची परंपरा सुरु केली. जुलमी निजामशाही राजवटीच्या कालखंडात अहिंसेच्या मार्गाने हिंदु धर्मात पवित्र आणि पुजनीय मानल्या जाणार्‍या गायीची हत्या रोखण्यासाठी चिंचाळा येथे गायीला मिठी मारुन गोहत्या थांबवली त्याप्रसंगानंतर अनेक ठिकाणी गोहत्या बंदीचा लढा त्या काळीच संत भगवानबाबा यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो परकीय सत्तेविरुद्ध लढा चालू होता त्यामध्ये अहिंसेच्या मार्गाने सहभाग नोंदवून अनेक लोकांचे मनाधैर्य वाढवून त्यांना धिर दिला, एकत्र आणले, अन्यायाच्या विरोधात अध्यात्मिक ज्ञानशक्तीच्या बळावर आपण लढू शकतो व जिंकू शकतो ही प्रेरणा ही स्फुर्ती अनेक देशप्रेमींच्या मनात निर्माण केली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम जो निजामशाहीच्या विरोधात लढा चालू होता त्यामध्ये सुद्धा अनमोल आणि अतुलनीय असे योगदान देवून निजामाच्या ताब्यातून मराठवाडा मुक्त होण्यासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावे एवढं मोठं योगदान राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि घराघरात शिक्षण पोहोचले तर प्रचंड हुशार आणि तल्लख असणारी ही माणसे यांची कार्यशक्ती योग्य मार्गाला लागून त्याचे सुयोग्य परिणाम होतील ही काळाची गरज ओळखून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या दारात आणण्याचे महान कार्य आधुनिक भगिरथ म्हणून संत भगवानबाबा यांचा उल्लेख क्रमप्राप्त आहे. ज्यांनी भक्ती आणि शक्तीचा व्यासपीठ असलेल्या भगवानगडावर अशक्य असतांना विद्यालयाची स्थापना करत गोर गरीब मुलांची उच्च शिक्षणाची सोय केली आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी अन्नछत्र नावाने बोर्डींग चालू केली ज्यामध्ये हजारोच्या संख्येने शिक्षण घेवून विद्यार्थी मोठे झाले. रुढी, परंपरा, अंधश्रद्धा या विळख्यात सापडलेला समाज अध्यात्माच्या माध्यमातून योग्य मार्गावर आणण्याचे अनमोल कार्य केले. तसेच निजाम कालीन राजवटीत धर्म संकटात असतांना सर्वांचे एकीकरण करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह, नारळी सप्ताह, दिंडी, भजन किर्तन असे उत्सव स्वतःच्या पुढाकारातून भरवुन ऐक्य निर्माण केले आणि हिंदु बांधवांना जागृत केले.

 नारायणगडावर असतांना महंत पदावरुन वाद विकोपाला जावू नये म्हणून महंत पद हे भिक्षेची झोळी आहे असं आपल्या भक्तांना समजावून हिमालयात जाण्याचा निर्णय भगवानबाबा यांनी घेतला परंतू खरवंडीचे बाजीराव पाटील यांच्या मातोश्री व सद्गुुरु बंकट स्वामींचे शिष्य यांनी संत भगवान बाबा परत यावेत म्हणून केलेला अन्न त्याग व बाजीराव पाटील यांचे चाणाक्ष प्रयत्न व सदगुरु सहजानंद भारती यांची योग्य शिष्टाई मुळे भगवानबाबांना परत यावे लागले व बहुजनांना हक्काचं धर्मपीठ म्हणून धौम्य गडाची खरवंडीच्या डोंगरावर स्थापना केली. पुढे याच धौम्यगडाचं राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री श्री.यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी आपले ऐतिहासिक मनोगत व्यक्त करतांना राजा-महाराजांनी शस्त्र, तलवार, गाजवून अनेक गड बांधले, जिंकले मला वाटले तशाच पद्धतीचा हा पण गड असेल परंतू येथे ह.भ.प.परमपुज्य शांतीब्रह्म भगवानबाबांनी वेदशास्त्र गाजवून गड बांधला आहे. माझे सहकारी ना.श्री.बाळासाहेब भारदे यांनी आपल्याबद्दल अनेक विशेष माहिती सांगितली मी स्वतः पंढरीच्या पांडूरंगांचा वारकरी आहे. देवावर आणि दैवावर माझा पुर्ण विश्वास आहे. देशभर वारकरी सांप्रदायाची भगवी पताका फडकत आहे. गड, किल्ले येथूनच महाराष्ट्राचा राजकीय आणि अध्यात्मिक कारभार चालत आलेला आहे आणि तसाही पुढे चालत राहणारा आहे. हा गड अध्यात्मिक क्षेत्रात अढळ असा नवा धु्रवतारा आज निर्माण झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून संत एकनाथ महाराज यांच्या पर्यंत सर्व संतावर त्या -त्या काळातील दुर्जनांनी अन्याय केला त्रास दिला परंतू ते शांतीब्रह्म असल्याने लोकांवर न रागवता त्यांच्या अपराधाला क्षमा करुनच उदारता दाखवली. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभुती जन्म घेत असतात. भगवान बाबा तर बैसोनी पाणावरी वाचियेली ज्ञानेश्वरी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगवानबाबांचा सिंहाचा वाटा आहे तसेच मराठवाडास्थित निजामाच्या अन्याया-अत्याचाराविरोधात लोकांच्या मनात अध्यात्माच्या माध्यमातून प्रेरणादायी शक्ती निर्माण करुन खुप मोठी स्वातंत्र्यसैनिकाची फळी बाबांच्या माध्यमातून उभी राहीली. अंधश्रद्धा निर्मुलन, पशु हत्या, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार अध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या जिवनामध्ये जागृती अनेक लोकांमध्ये अध्यात्मिक वाढीस लावण्यासाठी केलेले अहोरात्र प्रयत्न हे सर्व भगवानबाबांचे कार्य सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे आहे. बाबांनी अनेक शाळा सुरु केल्या, वसतीगृहे चालविली, औरंगाबाद सारख्या शहरात गोर-गरीब मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बोर्डींग चालू केली. धौम्य गडावर चालू केलेल्या शाळेचे मी आज उद्घाटन झाले असे जाहीर करतो. भगवानबाबा यांनी केलेले कार्य आणि त्यांची किर्ती अलौकिक आहे मी पूर्वी ऐकलेली किर्ती आणि येथे आल्यापासून पाहिलेला जनसमुदाय कार्यकर्ते अध्यात्मिक राजकीय, सरकारी क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील बाबांच्या प्रती असलेली ही प्रचंड श्रद्धा बाबांचे अलौकीक कार्य आणि लोकमताचा आदर म्हणून राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने धौम्य गडाची भगवानगड असे नामकरण घोषित करतो असे तात्कालीन मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केलेे.

महाराष्ट्राच्या पावन भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, साई बाबा, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरु वामनभाऊ महाराज, संत सावता महाराज असे संत महापुरुष, सिद्धपुरुष, होऊन गेले असेच राष्ट्र संत भगवानबाबा ज्यांनी जातीभेद, धर्मभेद, वर्ण-रंग, रुप अशा गोष्टींना कधीही थारा दिला नाही याचे कृतीशील उदाहरण म्हणून त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून आणि भगवानगडाचे महंत म्हणून ह.भ.प. भिमसिंह महाराज राजपूत यांची निवड केली.

बाबांच्या महान अलौकीक कार्यास जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!