संपादकीयसामाजीक

केज शहर अतिक्रमणाने कोंडलेली स्मार्ट सिटी 

केज । प्रतिनिधी

स्मार्ट सिटी म्हणजे अशी शहरे जी आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी नागरी प्रशासन, पर्यावरणपूरक उपाय आणि उच्च जीवनशैली यांचा समतोल साधून विकसित केलेली शहरे. या शहरांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, माहिती व्यवस्थापन प्रणाली आणि स्वयंचलित यंत्रणा वापरून नागरी सुविधांचा अधिक चांगला लाभ नागरिकांना दिला जातो त्यामध्ये सर्व कांहि नागरी विकासाच्या बाबी असतात. मात्र केज शहर हे स्मार्ट सिटी न होता अतिक्रमनाने वाढलेली स्मार्टसिटी म्हणुन पंचक्रोशीत तथा जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे .

केज शहराचा ग्रामपंचायत ते नगर पंचायत व भविष्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद असा प्रवास सुरु असताना हा प्रवास केवळ लोकसंख्या आधारीत झालेला आहे विकास आधारीत प्रवास झाला असता तर केज शहर अतिक्रमनाच्या विळाख्यात सापडले नसते व केज शहराचा सर्वांगिन विकास साध्य झाला असता . दोन राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले केज शहर मात्र गळा दाबल्यासारखे आतली आत कोंडुन गेले आहे . ते म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या अतिक्रमणामुळे हे अतिक्रमण काही दिवसापूर्वी प्रशासनाच्या वतीने मोठा फौज फाटा लावून निष्काशीत करण्यात आले होते . मात्र काही दिवस गेले आणि नंतर केज शहरात अतिक्रमणाचा विळाखा दिवसेंदिवस वाढत गेला. यामुळे सर्वसामान्य माणसाला रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे प्रशासन झोपेची सोंग घेऊन बसले आहे यातच कित्येक अपघात हे शहरांमध्ये होत आहेत याकडे मात्र सत्ताधारी व प्रशासन यांचे कसल्याही स्वरूपाचे लक्ष नाही 35 हजार लोकसंख्या असलेले केज शहर स्मार्ट सिटी झाले आहे मात्र ते विकासासाठी नव्हे तर अतिक्रमणासाठी .केज तालुक्यातून सर्वसामान्य , गरीब,कष्टकरी, शेतकरी,मजुर,शालेय विद्यार्थी आपल्या कामासाठी वा शिक्षणासाठी शहरात येतात मात्र त्यांना सामना करावा लागतो तो अतिक्रमणामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्या असंख्य वाहणांचा . जीव हातात घेऊन त्यातून मार्ग काढतकाढत आपले कामे वा शिक्षण पूर्ण करावे लागते .’ तहसिल कार्यालय, पंचायत समीती, केज बसस्टँड,तथा राष्ट्रीय महामार्गालगत निष्काशित ( काढलेले ) अतिक्रमण परत जर प्रशासनाच्या वा पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने बसू दिले जात असेल तर लाखो रुपये खर्च करून अगोदरच अतिक्रमण निष्काशीत का केले गेले ? या अतिक्रमण धारकावर कारवाई होणार कि नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकात होत आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!