केज । प्रतिनिधी
केज तालुक्यातील काही भागांमध्ये सध्या अवैधरित्या सुरू असलेला मटका व्यवसाय तरुणांच्या भविष्यासाठी मोठा धोका ठरत आहे. रोजगाराच्या संधी कमी असल्याने व जलद पैसा कमावण्याच्या लालसेने अनेक तरुण या अनैतिक मार्गाकडे वळत आहेत. त्यामुळे केवळ त्यांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचेही आयुष्य उध्वस्त होताना दिसत आहे.मटका हा एक प्रकारचा जुगार असून तो कायद्याने गुन्हा मानला जातो. मात्र, पोलिसांचे दुर्लक्ष, स्थानिक राजकीय वरदहस्त, आणि वाढत्या बेरोजगारीमुळे केजमधील व तालुक्यातील विविध गावांमध्ये मटका केंद्रे खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दैनंदिन लहान-मोठे आकडे लावण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक व मानसिक लूट सुरू असून, हरले की चोरी, फसवणूक, घरफोडी अशा गुन्ह्यांकडे त्यांचा कल वाढतोय, अशी चिंता सामाजिक कार्यकर्ते तथा सर्व सामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत.स्थानिक पोलिस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येते, मात्र ती फक्त औपचारिकतेपुरती मर्यादित राहते. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या असतानाही मटका खेळवणाऱ्या गटांवर व त्यांच्या म्होरक्यावर ठोस कारवाई होत नसल्याने जनतेमध्ये नाराजी दिसून येते आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!