भव्य मोफत आरोग्य शिबीराचा 250 रुग्णांनी घेतला लाभ
वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
हरि ओम हॉस्पीटल केज च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त तथा दिवाळी पाडव्याचे औचित्य साधुन भव्य मोफत आरोग्य शिबीरास मोठ्या प्रमाणात नागरीकांचा, रुग्नांचा प्रतिसाद मिळाला.

सविस्तर वृत्त असे कि डॉ. विजय मोराळे व डॉ स्वाती विजय मोराळे यांचे हरि ओम हॉस्पीटल केज च्या प्रथम वर्धापन दिन तसेच दीपावली व पाडव्याच्या औचित्य साधून भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते सदरील शिबिरात हृदयरोग, मधुमेह,किडनी विकार तज्ञ डॉक्टर श्रीकृष्ण गीते व त्वचारोग तज्ञ डॉ आशुतोष चाटे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजन केले होते.
सदरील शिबिरास केज शहरातील तथा तालुक्यातील नागरिकांनी, रुग्णांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.तसेच मोफत आरोग्य शिबिरास 250 रुग्णांची तपासणी, निदान व उपचार करण्यात आले. शिबिराचे आयोजन सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत करण्यात आले होते.तपासणी करण्यास आलेल्या रुग्णांना नागरिकांना अल्प उपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
हरी ओम हॉस्पिटल केज च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त केज मधील प्रतिष्ठित व्यक्तींनी पत्रकारांनी भेटून शुभेच्छा दिल्या.