आपला बीड जिल्हाक्राईम

पंकज कुमावत यांच्या पथकाने अहमदाबादहुन पॉंडेचरीकडे जाणारा सुगंधित तंबाखूचा ट्रक पकडला

१३ लाख ४४ हजाराच्या तंबाखूसह ४५ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात !

पोलीस आणि अन्न व औषधी विभागाची मोठी कारवाई !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

 महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची गुजरात राज्यातील अहमदाबादहुन पॉंडेचेरीकडे वाहतूक करणारा एक आयशर ट्रक सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पाठलाग करुन केज येथे ताब्यात घेतला. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठीं कारवाई केली.

 एका गुप्त खबरेमार्फत सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूची पॉंडेचेरी वाहतूक करणारा एक आयशर ट्रक केजकडे येत आहे. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज कुलकर्णी, सहाय्यक पोलीस फौजदार मुकुंद ढाकणे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, रामहरी भंडाने, राजु वंजारे, देसाई घुले, संजय टुले, यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

या पथकाने सापळा रचून दि गुरुवार दि १५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वा. च्या दरम्यान केज-बीड रोडवरील शिक्षक कॉलनी येथे ट्रक क्रमांक (एम एच-२४/ ए यु-७३२२) हा अडवला. आयशर चालक प्रदीप बळीराम सुर्यवंशी व सुमंत व्यंकट माने दोघे रा. हाडोळी ता. निलंगा जि. लातूर यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की, सदर ट्रक हा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून पॉंडेचेरीकडे जात होता. त्या ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेली प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या ८० गोण्या असल्याचे आढळून आले. प्रत्येक गोणीचे वजन हे २८ किलोग्राम असून एकूण २२ क्विंटल ४० किलोग्रॅम वजन असलेली सुगंधी तंबाखू जप्त केली. सदर ८० पोते सुगंधित तंबाखूची किंमत ही ६०० रु. प्रती किलोग्रॅम प्रमाणे १३ लाख ४४ हजार रु. आहे. तसेच तंबाखूसह आणि ट्रक असा एकूण ४५ लाख ४४ हजार रु. चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

दरम्यान अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादी वरून दि. १६ सप्टेंबर रोजी केज पोलिसांत गु र नं ४१४/२०२२ अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) ३०(२) (ए) ५९ आणि भा दं वि १८८, २७२, २७३ व ३२८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!