वादळवार्ता – केज
केजकडे मोटार सायकलावरून जात असलेले एक सहशिक्षक भागवत महादेव तांदळे वय. 48 वर्ष रा. अबिलवडगाव ता.जि. बीड आणि त्यांच्या पत्नी महानंदा भागवत तांदळे हे मोटार सायकल वरून सकाळी ११ . 30 वा. येत असताना केज-मांजरसुंबा रोडवर सारणी सांगवी पाटीवर एका इको सँडची वाहतूक करणाऱ्या टिप्परची व त्यांच्या मोटार सायकलची धडक झाली.
यात मोटार सायकल चालवीत असलेल्या सहशिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन महिलेला पुढील उपचारासाठी लातूर येथे रवाना केल्याचे समजते .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!