आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचा पत्रकारांनी वाचविला जीव…

वादळवार्ता – गौतम बचुटे

विहिरीतील पाण्यात पडलेल्या कोल्ह्याचे प्राण दोन पत्रकार मित्रांच्या सतकर्तेमुळे वाचले.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगांव येथील माजी सैनिक महादेव वरपे यांच्या विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती पत्रकार जय जोगदंड आणि त्यांचा मित्र अक्षय वरपे यांना मिळाली त्यांनी तात्काळ ही माहीती एका पत्रकारा मार्फत वन परिमंडळ धारूरचे शंकर वरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक साळेगाव येथे रवाना केले. या पथकात वनरक्षक वचिष्ठ भालेराव, सिद्धेश्वर चव्हाण, चालक शाम गायसमुद्रे आणि गोके यांनी स्थानिक जय जोगदंड व अक्षय वरपे यांच्या मदतीने विहिरीतील पाण्यात बुडत असलेल्या कोल्ह्याला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.

या बद्दल जय जोगदंड, अक्षय वरपे यांच्यासह वनरक्षक वचिष्ट भालेराव, शाम गायसमुद्रे, सिद्धेश्वर चव्हाण आणि गोके यांचे प्राणिमित्रांकडून कौतुक होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!