वादळवार्ता/गौतम बचुटे
हॉटेलच्या जेवणाच्या बीलावरून मॅनेजर सोबत भांडण करून मॅनेजर व आचाऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली.
या बाबतची माहिती अशी की, दि. २९ सप्टेंबर रोजी केज येथील अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल सुजित मध्ये रात्री ८:३० वा. च्या सुमारास बबलु केंद्रे, चौधरी दोघे (रा. अंबाजोगाई) व ईतर ६ अनोळखी हे जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी मांसाहारी जेवण झाल्या नंतर बील देण्यासाठी हॉटेलचे मॅनेजर प्रकाश भांडवलकर यांच्याकडे काऊंटर समोर आले. त्यांचे जेवणाचे बिल हे २ हजार ३०० रू. बील झाले होते. त्यावर बबलु केंद्रे हा मॅनेजर प्रकाश भांडवलकर यांना म्हणाला ऐवढे बील आम्ही देणार नाही; हे बील कमी करा. त्यावर प्रकाश भांडवलकर त्यांना म्हणाले की, हे बील कमी होत नाही सर्व फिक्स रेट आहेत. असे म्हणताच बबलु केंद्रे याने प्रकाश भांडवलकर यांना शिवीगाळ करून चापटा मारल्या. तेव्हा हॉटेलमध्ये आचाऱ्याचे काम काम करणारा रवि पुरी हा आला भांडण सोडविण्यासाठी आला असता चौधरी याने गाडीतील लोखंडी रॉडने रवि पुरी याला खाली पाडुन त्याचे उजवे पायावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच हॉटेल मॅनेजर प्रकाश भांडवलकर व वेटर बिभीषन लांब यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
हॉटेलचे मॅनेजर प्रकाश भांडवलकर यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात बबलू केंद्रे, चौधरी व त्यांचे अनोळखी ६ साथीदार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५९०/२०२३ भा. दं. वि. १४१, १४३, १४७, १४९, ३२३, ३२६, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!