नांदेड येथे माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा जल्लोषात संपन्न…
वादळ वार्ता – नांदेड
येथील अतिथी कॉन्फरन्स हॉल येथे 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळात माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन च्या वतीने मराठवाडा स्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा जल्लोषात संपन्न झाला.

या मेळाव्यात अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काम करताना येणाऱ्या अडचणी व उपाय या वर मनोगत व्यक्त केले.

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी शासन प्रशासन याना माहिती अधिकार कायदा नको आहे.ते कायदा संपवायला निघाले आहेत,पण जनतेचा कायदा आता जनतेने एकत्र येऊन वाचवला पाहिजे.आमचे प्राण गेले तरी चालतील पण आम्ही हा कायदा वाचवू असे मनोगत व्यक्त केले.
त्या बरोबरच लातूर जिल्हा कार्यध्यक्ष दत्तात्रय बेंबडे यांनी कार्यकर्ते जोडून संघटना वाढविणार अशी घोषणा केली. हिंगोली जिल्हा अध्यक्ष पंडित तिडके यांनी यांनी कायद्याचा नेमका कसा वापर करावा हे सांगितले. परभणीचे कार्यकर्ते व पत्रकार विठ्ठल साळवे यांनी कार्यकर्त्याना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी हे सांगितले. जालना जिल्हा अध्यक्ष सखाराम घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. मोतीराम काळे यांनी खुमासदार शैलीत त्यांचे अनुभव सांगितले.या मेळाव्यात अजित गट्टाणी यांची नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले.
सदरील मेळाव्यास मराठवाड्यातील असंख्य माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!