वादळवार्ता/केज
दिनांक १५/०४/२०२४ रोजी तहसील कार्यालय केज येथे मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप प्रोग्राम अंतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यांत आलेली होती. सदर स्पर्धेमध्ये सरस्वती कन्या प्रशाला केज, वि.दा. कराड वि. केज, सानेगुरुजी निवासी प्रा.वि. केज, स्वामी विवेकानंद वि. केज, या शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
सदर उपक्रमांस श्री. दीपक वजाळे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी भेट देवुन स्पर्धकांना प्रोत्साहीत केले तसेच श्री. तरंगे सर तहसीलदार अंबाजोगाई व श्री. जगताप सर तहसीलदार केज यांनी मतदान करण्यांविषयी आवाहन केले. व श्री. बेडसकर एल बी गटशिक्षणाधिकारी केज यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या स्वीप उपक्रमांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमांस कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक यांचा मोठा सहभाग होता.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!