आपला बीड जिल्हाआपले केज
साळेगांव जवळील पुलावर कार पुलाला धडकली : एअर बॅगमुळे वाचले चालकाचे प्राण

वादळवार्ता – गौतम बचुटे
केज-कळंब रोडवर साळेगांव जवळील एका पुलावर ब्रिझा गाडी पुलाला धडकून भीषण अपघात झाला; मात्र सुदैवाने प्राणहानी झालेली नाही.
या बाबतची माहिती अशी की, दि. २२ मे रोजी मध्यरात्री १२:४५ वा. तुकाराम देशमुख सहशिक्षक हे कळंब येथील लग्न आटोपून त्यांच्या ब्रिझा गाडी क्र. (एम एच१४/जे एक्स ११०३) ने केजकडे येत होते. ते साळेगांव जवळील पारखे यांच्या शेता जवळ आले असताना समोरून येणाऱ्या एका अवजड वाहनाने त्यांना हुल दिल्याने वाहनावरील त्यांचे नियंत्रण सुटून पुलाला गाडी धडकली. त्यात गाडीचे समोरील टायर तुटुन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र चालक तुकाराम देशमुख सर यांनी सीट बेल्ट बांधलेला असल्याने गाडीतील सुरक्षा रक्षक यंत्रणा व जीव रक्षक प्रणाली कार्यान्वित होऊन दोन्ही एअर बॅग्ज ओपन झाल्या. त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र चालक देशमूख सर यांना किरकोळ व मुका मार लागला असून गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे .
गावकरी मदतीला धावले :- अपघाताची माहिती मिळताच साळेगांव येथील ज्ञानेश्वर इंगळे, पत्रकार गौतम बचुटे, राहुल गायसमुद्रे, परवेज सय्यद, मिनाज सय्यद, सय्यद आणि दत्तात्रय ठोंबरे सर, सुरेश काळे, अर्जुन बोराडे व बोराडे हे घटनास्थळी धाव घेत अपताग्रस्तांना मदत केली.



