आपला बीड जिल्हाक्राईम

दारुड्याने एसटी बसवर दगड मारून काच फोडला

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील पिंपळगाव पाटी जवळ एका दारुड्याने चालत्या एसटी बसवर दगड मारून काच फोडला आहे.

या बाबतची माहिती अशी की, रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वा. धारूर आगाराची बीड-केज ही गाडी क्र.( एम एच-२०/डी-९९२३) ही गाडी विड्याहुन केजकडे येत असताना पिंपळगाव फाट्या जवळ एका दारुड्या इसमाने गाडीच्या डाव्या बाजूच्या समोरील काचावर दगड मारून काच फोडला. तसेच चालक व वाहक यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी चालक अशोक हुंबे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!