वादळवार्ता – केज
केज तालुक्यातील चिंचोली माळी चे भूमिपुत्र प्रा.श्री किशोर बाबुराव दळवे यांनी दि.९-४-२०२३ रोजी शिर्डी येथे झालेल्या आठव्या नॅशनल रायफल व पिस्टल/स्लिंगशॉट चॅम्पियनशिप -२०२३ सदरील नॅशनल पातळीवरील स्पर्धेत पिस्टल या प्रकारात ओपन वयोगटातील प्रवर्गातून अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून कास्यपदकाला गवसणी घातली आहे.
सदरील स्पर्धेचे आयोजन एअर गन असोसिएशन ऑफ इंडियन व स्लिंगशॉट असोसिएशन ऑफ इंडियन यांच्यामार्फत केले होते.
प्रा.श्री किशोर दळवे यांच्या या यशाबद्दल दगडू दळवे, बाबुराव दळवे, महादेव दळवे, आशा दळवे, दया दळवे,प्रा.श्री अशोक कोरडे , प्रा.डॉ. सुनिल पंढरे यांनी अभिनंदन केले यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!