वादळवार्ता – केज
केज तालुक्यातील मौजे सुकळी गावातील गायरानांकडे जाणारा पाणंद रस्ता चक्क जेसीबी लावुन खोदल्यामुळे शेतीवर आधारीत असणाऱ्या दलित शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
या बाबत सवित्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील मौजे सुकळी गावातील एकुण १२ दलित कुटुबांचा उदरनिर्वाह सर्वे न. ४० या गायरान जमीनीवरती आहे.
सदरील गायरान सुकळी गावापासून साधारण आर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती असुन शेतीकडे ये-जा करण्यासाठी फार पूर्वीपासूनचा रस्ता असुन पाणंद रस्त्याच्या तिकाटण्याच्या बाजुस असणारे आबाराव नागोराव गायकवाड व पोपट नागोराव गायकवाड यांनी गायरानाकडे जाणारा पाणंद रस्ताच जेसीबी च्या मदतीने खोदला असल्यामळे १२ कुटुंबाना गायरानाकडे ये-जा करण्यासाठी त्रास होत असुन सदरील पाणंद रस्ता मजबुत करुण देण्यात यावा अन्यथा दि २१ जुन रोजी तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषण करणार असल्याचे तक्रार निवेदन केज तहसिल मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विभागीय आयुक्त औरंगाबाद तसेच जिल्हाधिकारी बीड व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बीड यांना देण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर मन्मथ त्रिंबक मस्के, भगवान संभाजी वाघमारे , अशोक बन्सी वाघमारे , अविदाबाई बन्सी वाघमारे , श्रावण संपत वाघमारे , बजरंग त्रिबंक मस्के , गणपत संभाजी वाघमारे , जयसिंग संपत वाघमारे, भारत दादाराव जावळे , पवन गणपत वाघमारे , सचिन भगवान वाघमारे , राहुल सर्जेराव वाघमारे , पांचाला गोरोबा लांडगे इत्यांदीच्या सह्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!