आपला बीड जिल्हाआपले केजकला

केज रोटरीच्या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद ; या शाळांनी पटकावला क्रमांक

वादळवार्ता – केज

येथील रोटरी क्लब ऑफ केज च्या तालुकास्तरीय शालेय सांस्कृतिक कार्यक्रमास केज तालुक्यातील शाळांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या तालुकास्तरीय शालेय सांस्कृतिक स्पर्धेत प्राथमिक गटात जि प प्रा.शा ढाकेफळ यांनी प्रथम, जि प प्राशा पिसेगाव यांनी द्वितीय, तर जिप प्रा सहा मस्साजोग यांनी तिसरा क्रमांक पटकावला. या गटात सरस्वती कन्या प्रशालेस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. माध्यमिक गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक शाळेस प्रथम, पवनराजे इंग्लिश स्कुल शाळेस द्वितीय व प्रा डॉ विश्वनाथराव कराड शाळेस तिसरा क्रमांक मिळाला. या गटात उत्तेजनार्थ पारितोषिक रामराव पाटील माध्यमिक शाळेस मिळाले.

केज रोटरी दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त या शाळेचे आयोजन करत असते. शहरातील अनेक गुणवंत कलाकार आपापल्या शाळेच्या रंगमंचावर आपली कला सादर करतात मात्र त्यांना केज शहर व तालुक्याच्या सार्वजनिक रंगमंचावर असंख्य प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करता यावी म्हणून रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करत असते. यावर्षी शहर व तालुक्यातील वीस शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता.

प्रत्येक शाळेला कोणतेही दोन गीतावर सर्वोत्कृष्ठ नृत्य सादर करण्याची संधी दिली होती. यावेळी सर्वच शाळेच्या कलाकारांनी अप्रतिम नृत्ये सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा डॉ बी जे हिरवे,  विकास मिरगणे व धनराज पुरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केले. पुढील वर्षी हा कार्यक्रम नियोजनबद्ध व अधिक चांगल्या प्रकारे घेण्यात येईल असेही घोषित करण्यात आले.

यावेळी प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, माजी अध्यक्ष अरुण अंजान, श्रीराम शेटे, श्रीराम देशमुख यासह आदिनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!