स्त्रीरोगतज्ज्ञ वर्ग १ पदावर होणार नियुक्ती
वादळवार्ता वार्तांकन – शेख शाकेर ( नेकनुर )
नेकनूर दि. २२(प्रतिनिधी ) नेकनुर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ, , डॉ.अरुण घुगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून वैद्यकीय अधिकारी वर्ग १ म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल नेकनूर येथील पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आज सन्मान करण्यात आला.
डॉ.अरुण घुगे हे नेकनूर येथे जवळजवळ चार ते पाच वर्षापासून स्त्री व कुटीर रुग्णालयात कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत रुग्णासाठी खूप मोठी सेवा दिलेली आहे. त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून दवाखान्यामध्ये एक नामलौकिक मिळवलेले डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे आज पाहिले जाते.
या नोकरीमध्ये कार्यरत असतानाच जिद्द व चिकाटी,परिश्रम घेऊन त्यांनी या परीक्षेचा अभ्यास केला व मागील महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या परीक्षेत वैद्यकीय अधिकारी श्रेणी वर्ग १ अधिकारी म्हणून परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकची रँक प्राप्त करून नावलौकिक मिळवले या परीक्षासाठी महाराष्ट्रातून शेकडो डॉक्टर परीक्षेस बसले होते, परंतु यामध्ये डॉ. अरुण घुगे यांनी यात यश प्राप्त करून तिसऱ्या क्रमांकाची रँक प्राप्त केली. त्याबद्दल नेकनूर येथील पत्रकार संघाच्या वतीने आज त्यांचा सत्कार ग्रा. पं सदस्य तथा पत्रकार तुळजीराम शिंदे सर ग्रा. पं सदस्य तथा पत्रकार , सय्यद खालेद,रिपोर्टर चे पत्रकार अमजद पठाण,, डॉक्टर पाटील सर पत्रकार आर्शद सय्यद, संभाजी भोसले प्रा. मुजावर एस.टी. यांनी स्त्री व कुटीर रुग्णालयात जाऊन त्यांचा शाल श्रीपळ व लेखणी देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी स्त्री व कुटीर रुग्णालयातील डॉक्टर,नर्स, इतर कर्मचारी, गावकरी, दवाखान्यातील रुग्ण इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!