वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करून चळवळीच्या माध्यमातुन कार्य करणारे भगवंतआप्पा वायबसे यांची सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि समाजाच्या प्रती जनसेवेची भावना घेऊन सामाजीक कार्य करणाच्या दृष्टीकोणातुन राष्ट्रीय कार्यकारीनीच्या झालेल्या बैठकीमध्ये सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी केज तालुक्यातील कासारी गावचे भगवंत आप्पा वायबसे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीदरम्यान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यत जावुन शेवटच्या घटकापर्यत न्याय देण्याचे तथा भ्रष्टाचार विरोधी कार्य करणार असल्याचे मत भगवंत आप्पा वायबसे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निवडीने सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.