वादळ वार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पांडुरंग नामदेव राऊत व त्यांच्या पत्नीवर अज्ञातांनी हल्ला केलेल्याची घटना घडली असून त्यामध्ये पांडुरंग राऊत यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पांडुरंग राऊत (वय ५५) व त्यांची पत्नी ह्या वरपगाव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रस्त्यालगत राहत होते. दरम्यान दि.११ जुलै रोजी सायंकाळी ७:०० ते ७:३० वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी काही अज्ञात लोक आले व पांडुरंग राऊत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढू लागले. त्यावेळी पांडुरंग राऊत यांनी विरोध केला असता सदरील ठिकाणची लाईट बंद करून अज्ञानतांनी पांडुरंग राऊत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या पत्नी शशिकला राऊत यांच्यावरही हल्ला केला त्यामध्ये काही गंभीर जखमी झाल्या आहेत.
सदर घटना घडल्यानंतर जखमींना तात्काळ केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी पांडुरंग राऊत यांना मृत घोषित केले. तर शशिकला राऊत यांच्यावर उपचार चालू आहेत.
दरम्यान सदर घटनेची खळबळ माजली असून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग व पोलीस नाईक राजू गुंजाळ हे दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी केल्याची माहिती देण्यात आली. सदरील हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप खात्री झाली नसुन पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!