केज । प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे साबला येथे ” उत्तरेश्वर महाराज ” यांच जागृत देवस्थान असल्यामुळे येथील तरुण मित्रमंडळींनी स्वच्छता अभियान राबवलं . त्याची सुरुवात श्रीराम भक्त हनुमान महाराज मंदिर ते उत्तरेश्वर महाराज जागृत देवस्थान पर्यंत चा रस्ता व मंदिर परिसरातील पूर्ण स्वच्छता करण्याचं काम तरूणांनी पूर्ण केलं . तसेच गेल्या अनेक वर्षांपासून साबला येथील तरूण मित्रमंडळी साबला या गावात नेहमी कोणत्यानं कोणत्या कारणाने गावात स्वच्छता अभियान राबवत आहेत . गावातील तरुणाचं असं मत आहे ” माझा गाव , स्वच्छ गाव ” माझा गाव , सुंदर गाव ” या प्रमाणे गावातील तरुण मित्रमंडळी या अभियानात सहभागी होतात . आणि स्वच्छता अभियान राबवण्याचे काम करतात . या मध्ये आदर्श शिक्षक नरहरी काकडे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पोपट काकडे , माजी उपसरपंच काशिनाथ नाईकनवरे , इंजिनियर महेशराव काकडे , राहुल मुळे , गणेश कटारे , लखन राऊत , राजेभाऊ काकडे , वसंत नाईकनवरे , संदिपान काकडे , अनंत नाईकनवरे , अनिल भोसले , सदाशिव काकडे , जालींदर मुळे इत्यादी तरूण मित्रमंडळींनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!