शुभ मंगल सावधान होताच वधू वरांनी केले जोडीने मतदान !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
शहरी भागा पेक्षा मतदानाचा टक्का हा ग्रामीण भागात चांगला असतो आणि त्यातल्या त्यात जर ग्रामपंचायतीचे मतदान असेल तर वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानाला नेऊन त्याचे मतदान केले जाते म्हणजेच ग्रामीण भागात मतदानाच्या बाबती मतदार जागरूक असतो.
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील साळेगांव येथे लग्न होताच नवरा नवरीची वरात बुलेटवरून थेट मतदान केंद्राच्या दारात पोहीचली आणि त्यांनी गावच्या निवडणुकीत मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य निभावले.
दि . १८ डिसेंबर रोजी साळेगांव ता केज येथील संजय दादाराव कळसकर यांचे चिरंजीव रामेश्वर उर्फ नामु यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील वासुदेव भगवान राशकर यांची कन्या वैष्णवी हिच्याशी दुपारी १२:३१ वा शुभमुहूर्तावर वऱ्हाडी मंडळी यांच्या उपस्थितीत देव ब्राह्मनांच्या साक्षीने पार पडताच नववधू-वरच्या डोक्यावर मंगलाष्टका नंतर अक्षता पडल्या नंतर अग्नी देवतांच्या साक्षीने त्यांनी सप्तपदी पार पडताच तात्काळ त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब आणि श्रीमंतांना प्रत्येकाला दिलेल्या एक मत आणि त्याचे समान मूल्य दिले आहे. ते साळेगांव येथे वधू वरांनी लग्नाच्या मंगल अष्टका झाल्या नंतर डोईवर आशीर्वादाचा अक्षता पडताच चि. नामदेव आणि चि. सौ. कां. वैष्णवी साळेगांव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बुलेट वरून येत आपला मतदानाचा हक्क बजावला.https://youtu.be/Tc_Xlhr8p9s



