वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यात एका सत्तावीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, केज तालुक्यातील एक सत्तावीस वर्षीय विवाहित महिला ही दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २:०० च्या सुमारास शेतात जात असताना एका नराधमाने तिला पाहून शिट्ट्या मारल्या आणि पाठलाग करून इशारा करीत विनयभंग केला.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात नराधमा विरुद्ध गु. र. नं. ८१/२०२३ भा. दं. वि. ३५४ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!