आपला बीड जिल्हा

शेतकर्‍यांची फसवणुक सोयाबीनचे बियाने उगवलेच नाहि – शेतकरी संतप्त !

गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार

 

वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब

केज तालुक्यात यावर्षीचा पाऊसमान चांगला आहे. शेतकर्‍यामध्ये समाधानाचे वातावरण आहे . जवळपास नव्वद टक्के पेरणी अटोपली आहे . शेतकर्‍यानी जे बियाने पेरले त्याची उगवण्याची वाट बघत आहे .

मात्र लव्हरी येथील शेतकरी भारत बन्सी चाळक यांचे सर्वे न. 185 / 1 मर्दाल दोन एकर सोयाबीन ग्रिनगोल्ड कंपनीचे KDS-726 हे वान उगवले नसल्यामुळे सदरील शेतकरी चितांग्रस्त झाला आहे.

पेरणी करीता कर्ज काढुन सोयाबीन  ग्रिनगोल्ड कंपनीचे KDS – 726 या वाणची खरेदी केली मात्र सोयाबीन उगवले नसल्यामुळे शेतकर्‍यानी कृषी विभाग व गटविकास अधिकारी पंचायत समीती केज यांच्याकडे सदरील कंपनी विरूद्ध तक्रार दाखल दि 04 जुुलै रोजी केली असता अद्याप पर्यंत तक्रारीची दखल घेतली नाही वा पंचनामा केला नााही म्हणून सदरील शेतकरी वाट पहात आहे शासकीय मदतीची.

__________________________

केज तालुक्यातील शेकडो शेतकर्यांची बियाणे न उगवल्यामुळे आर्थीक नुकसानी सह फसवणुक झाली प्रकरणी बियाणे कंपनी व कृषी सेवा केद्र चालकावर गुन्हे दाखल करत शेतकऱ्याना शासकिय मदत मिळवुन देण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून बि-बियाणे,खत, पेरणी -मजुरी खर्च पाहता कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्याच्या नुकसान प्रकरणी शेतात जाऊन कृषी विभागाने सयुक्त पंचनामा करावा व दोषी बोगस बि बियाने विक्री चालकासह कंपणीवर ४२० फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

महेश जगताप

महा.राज्य उपाध्यक्ष

अन्याय अत्याचार व भ्रष्ट्राचार ≡विरोध समीती

__________________________

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!