वादळवार्ता/केज
दि. २९ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह केज येथे सांय. ४ वाजता सकल मराठा समाज यांच्या वतीने दि १२ डिसेंबर २०२३ रोजी मनोज जरांगे पाटिल यांच्या सभेच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते . सदरील पत्रकार परिषदेमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सभेच्या तयारीसंदर्भात मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाच्या वतीने असे सांगण्यात आले कि
केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणा निमित्त महासभेचे आयोजन दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले असून त्या अनुषंगाने बोरी सावरगाव ते बनसारोळा रस्त्यालगत १३६, एकर जागेचे नियोजन करण्यात आले आहे त्या जागेचे शेतातील उभे पीक नष्ट करून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी शेतकऱ्यांनी जागा करून दिली. तसेच या सभेसाठी महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
त्या बरोबरच या सभेचे आर्थिक नियोजन केज तालुक्यातील २५ गावानी केले असल्याचे सांगण्यात आले असुन या सभेला केज तालुक्यातील सकल मराठा समाजाने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!