आपले केजसामाजीक

सप्ताहातून अभिनव उपक्रम  ह भ प लाड गुरुजीच्या हस्तै माळ घालून वर्षभर दारु न पिणाराला गावाकड्न आहेर…  

वादळवार्ता – केज

तालुक्यातील  सांगवी ( सा )  येथील वार्षिक रामकृष्ण हारी अखंड जपनाम सप्ताह आयोजित केला जातो यामध्ये अभिनव उपक्रम राबविण्यात येत असतात त्यामधे ह भ प अर्जुन महाराज लाड यांच्या हातानी गळ्यात पुष्पहार घातल्या नंतर वर्षभर दारूला हात लावायाचा नाही तर दुसऱ्या वर्षीच्या सप्ताहात गावाच्या वतीने कपडे देऊन त्याचा सत्कार केला जातो. याच दरम्यान एका गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपयाची मदत देखील केली .

ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा शिष्यवर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शब्दाला प्रमाण माणनारे अनेक जन आहेत . तालुक्यातील सांगवी ( सा ) या गावात दरवर्षी रामकृष्ण हारी जपनाम सोहळा आयोजित केला जातो. या सप्ताहात मागील तीन वर्षापासून ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या हातानी गावातील दारु पिणाराला गळ्यात हार घातला जातो आणी गुरुजीच्या हातानी हार घातल्यावर वर्षभर दारु प्यायची नाही हा नियम स्वतः हून पाळयचा आणी पाळला जातो हे विशेष . वर्षभर दारु न पिणाराला गावाकडून कपड्याचा आहेर केला जातो .यावर्षी गावातील तिघांना आहेर करण्यात आला . याच बरोबर गावातील एका गरीब कुटुंबातील एका मुलीचे लग्न असल्याचे समजल्यानंतर गावकऱ्यांनी मिळून ५७ हजाराची रोख आर्थिक मदत देखील केली . असे विविध स्तुत्य उपक्रम सप्ताहात राबवले जात असल्याबद्दल ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी सर्व गावकऱ्याचे कौतुक केले .

यावेळी सरपंच संजय केदार , दत्ता धस , रमेश धस , राम बप्पा बिक्कड , वसंत अतकरे ,  अंगद गायकवाड ,  अमोल धस ,  नलनाथ धस , सुभाष बिक्कड , बालासाहेब पाटील , सखाराम महाराज सह गावातील तरुणाच्या उत्साहातून आसे उपक्रम राबवले जात आहेत .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!