वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेतील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा काल दि.08/08/22 रोजी गसाकें केज येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत जि.प.माध्यमिक शाळा, भाटुंबा या शाळेतील इ.9वी ची विद्यार्थीनी कु.प्रिया महादेव कापरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. संबंधित विद्यार्थीनीस तिचे शिक्षक श्री.प्रमोद शिंदे सर व श्रीम. आचार्य मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.
उर्दू माध्यमातून नुरजहाॅ केज येथील विद्यार्थीनी कु.शेख खैरुन्नीसा कमर प्रथम आली.
हे विद्यार्थी जिल्हास्तरावर केज तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गशिअ श्री.केंद्रे सरांनी विजयी स्पर्धकांना शुभेच्छा देत मोलाच्या सुचनादेखील केल्या. श्री.वेदपाठक सरांनी उपस्थितांचे आभार मानत स्पर्धेचा समारोप केला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!