वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज तालुक्यात बैलपोळा सण उत्साहाने साजरा करण्यात आला.बळीराजाने आपल्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या पशुधनाला खांदे मळणीच्या ओवाळणी करुन मानेला हळद व लोणी लावुन पाय धुण्यात आले. पोळ्याच्या दिवशी शिंगाना रंगरंगोटी करुन विवीध प्रकारचे साज घालुन गव्हाच्या कण्या आणी गुळवणीचा आस्वाद देण्यात आला.
दुपारच्या वेळी पुरणपोळीचा नैवेद्य देऊन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.यावेळी तरुणाईचा उत्साह शिगेला पोंहचला होता .सवाद्य मिरवणुकीनंतर पशुधनाला ओवाळणी करुन लग्न लावण्यात आले. ” चावुर चावुर चांगभल ! पाऊस आला जला घराला, हरहर महादेव ” असा गजर करत पशुधनाला ताम्हण वाजवुन प्रदक्षिणा घालण्यात आल्या . त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या परीवारा समवेत उपवास सोडला .पशुधनाप्रती आपल्या संवेदना व्यक्त करताना पशुंच्या डोळ्यातुन ही अश्रू ओघळताना दिसून आले. कोरोना महामारीच्या काळानंतर प्रथमच पोळ्याचा सणावरील निर्बंध हटल्यामुळे मोठ्या उत्साहाने सण साजरा करण्यात आला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!