आपला बीड जिल्हा

केज तालुक्यात बैलपोळा साजरा मात्र शेतकरी पावसाच्या उघडीपीमुळे चिंतीत !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडा नंतर यंदा केज तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांनी बैलपोळा सण साजरा केला. मात्र सुमारे पंधरा दिवसा पासून पावसाने उघडीप दिल्यामुळे ऐन शेंगा आणि फुलांच्या बहरात असलेली पिके कोमेजत आहेत. अशी अवस्था असतानाही शेतकऱ्यांनी बैल पोळा साजरा करून बैलांना सजवून वाजत गाजत मिरवणुका काढून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांंची पूजा करण्यात आली.

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा सण पोळा सणाची कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडा नंतर बळीराजाने जोरदार तयारी केली होती. पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून खांदेमळणी केली. शुक्रवारी सणाच्या दिवशी बैलांच्या गळ्यात कवड्याची माळ, चंगाळे घालुन शिंगे ही विविध रंगाने रंगवून शिंगाला लोकरीचे गोंडे, फुगे बांधले. पाठीवर ही विविध चित्रे असलेली झुलली टाकून बैल सजविण्यात आले होते. वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढून आणि मारुतीच्या मंदिराला प्रदर्शना घालून बैलांचे लग्न लावण्यात आले. या वेळी गृहणींनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांंची पूजा केली.

________________________

बैल पोळयाच्या मिरवणुकीत पोलीस आणि डॉक्टरही सहभागी :-केज येथील बैल पोळ्याच्या मिरवणुकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. त्रिंबक चाटे, श्रीकृष्ण नागरगोजे हे वैद्यकीय सेवेतील लोकांनी सहभागी होत आंनद घेतला.

________________________

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली :- केज परिसरात मागील पंधरा दिवसापासून पाऊस उघडला आहे त्यामुळे ऐन फुले आणि शेंगाच्या बहरात असलेल्या सोयाबीनच्या पिकाला धोका निर्माण झाला असून शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!